45 कोरोना पॉझिटिव्ह मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या योध्दांच्या हातांनीच केले रत्नागिरी खबरदारच्या अंकाचे प्रकाशन

0

रत्नागिरी : आपले काम हाच धर्म हे मानून या संकटाच्या काळात जातपात, धर्मभेद न करता रत्नागिरी नगरपालिकेचे कर्मचारी कोरोना मृतांचे अंत्यविधी करत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते आपली सेवा बजावत आहेत ती खरोखरच अतुलनीय अशीच आहे. आजवर या कर्मचाऱ्यांनी 45 कोरोना पॉझिटिव्ह मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांच्या याच सेवेचा सन्मान करण्यासाठी आज प्रसिद्ध होणाऱ्या रत्नागिरी खबरदारचे पहिले पान केवळ या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी समर्पित करण्यात आलं आहे. या साप्ताहिक अंकाचे प्रकाशन याच योध्दांच्या हाताने करण्यात आले. या प्रकाशनाला आरोग्य सभापती राजन शेट्ये, नगरसेवक निमेश नायर, खबरदारचे संपादक हेमंत वणजु, प्रतिनिधी सौरभ मालुष्टे व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरी खबरदारने या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेतल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी खबरदारचे आभार मानले व अंकाचे कौतुकाने वाचन देखील केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 30-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here