कोल्हापूरात संततधार : पंचगंगेच्या पातळीत वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी मंगळवार पासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. यापुर्वी दोन वेळा पात्रालगत वाहणाऱ्या पंचगंगा नदीचे पाणी आज सकाळी यंदा प्रथमच पात्राबाहेर पडले आहे. मंगळवारी सकाळी आठ पासुन ते आज सकाळी अकरा पर्यंत तब्बल १८.५ फुटांची वाढ होऊन, पातळी ३३.३ फुट झाली होती. रात्रभर संततधार कोसळणारा पाऊस आज थांबण्याची चिन्हे नसल्याने, पंचगंगेची वाटचाल ३९ फुटाच्या इशारा पातळीकडे सुरू होती. धोकापातळी ४३ फुट आहे. दरम्यान सध्या ८६ बंधारे पाण्याखाली गेले असुन, अनेक मार्ग बंद झाले आहेत. तर नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

➡ पंचगंगा नदी आज रात्री धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता; सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:25 PM 05-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here