जिल्ह्यात आतापर्यंत 1479 रुग्णांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 82 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या 2148 झाली आहे. त्यापैकी एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 596 आहे. दरम्यान 33 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1479 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.8 टक्के आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 9, समाजकल्याण मधील 19, कामथे, चिपळूण 4, आणि कळबणी खेड येथील 1 रुग्ण आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी – 32
कामथे – 17
कळबणी – 16
लांजा – 5
गुहागर – 7
देवरुख – 1
ॲन्टीजेन टेस्ट – 4

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2148
बरे झालेले – 1479
मृत्यू – 73
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 596

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:03 PM 08-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here