विजयदुर्ग किल्ल्याला गत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री उदय सामंत

0

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग किल्ल्याला गत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करु, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी कले. पालकमंत्री श्री सामंत यांनी आज विजयदुर्ग किल्ल्याची पहाणी केली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी खासदार विनायक राऊत, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सरपंच प्रसाद देवधर आदी उपस्थीत होते. विजयदुर्ग किल्ल्याचे संपूर्ण बजेट तयार करणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री सामंत पुढे म्हणले की, किल्ल्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी पुरतत्व विभगाशीही चर्चा करण्यात येईल. गरज भासल्यास किल्ल्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देऊ. येत्या वर्ष भरात किल्ल्याचे काम सुरु होईल. विजयदुर्ग ग्रामपंचायतीची नवीन इमारत उभारण्यासाठीही निधी देण्यात येईल. त्यासाठी ग्रामपंचायतने जागेचा प्रश्न मार्गी लावावा. विजयदुर्ग विकासासाठी आराखडा तयार करणार आसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. सुरवातीस मराठ्यांचे आरमार प्रमुख आनंदराव धुळप यांच्या वंशजांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:51 PM 15-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here