मुंबई : महात्मा फुले योजनेअंतर्गत कोरोना उपचार देणाऱ्या रुग्णालयांनी मोफत देणे अपेक्षित आहे. तरीही काही रुग्णालये मात्र शुल्क आकारत आहेत. तर काही रुग्णालये कोरोनाबाधितांना उपचार देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. या गोष्टीची दाखल घेत, आता महात्मा फुले योजनेतील कोरोना उपचार देणाऱ्या रुग्णालयांनी योजनेअंतर्गत मोफत उपचार न दिल्यास कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले आहेत. याशिवाय योजनेत समाविष्ट कोरोना उपचारासाठी शुल्क आकारल्यास पाचपट दंड घेणे, योजनेतून रुग्णालयांना वगळणे, रुग्णालयावर गुन्हा दाखल करणे अशी कठोर पावले उचलण्याच्या सूचनाही राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. अधिकाधिक खासगी करोना रुग्णालयांना योजनेत समाविष्ट करून रुग्णालयांच्या कामकाजावर लक्ष देण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 20-Aug-20