सिंधुदुर्ग : भारतीय सैन्यदलात असलेले दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावचे सुपुत्र सुभेदार अजय अनंत सावंत यांना क्रीडा क्षेत्रातील मानाचा मानला जाणारा अर्जुन पुरस्कार घोषित करण्यात आला. सिंधुदुर्गच्या सुपुत्राला अर्जुन पुरस्कार घोषित झाल्याने सर्वच स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. अर्जुन पुरस्कारासाठी सुमारे पाच हजार ऑनलाईन अर्ज दाखल झाले होते. त्यातून त्यांच्या नावाची घोषणा घोडेस्वारी क्रीडा प्रकारामधून करण्यात आली. आतापर्यंत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळवले आहेत. आता त्यांना सर्वोच्च पुरस्कार घोषित झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिनादिवशी २९ ऑगस्टला पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:59 PM 21-Aug-20