पारकर कुटुंबीयांनी याही वर्षी राखली पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची संकल्पना

0

रत्नागिरी : जिल्ह्यात दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठा उत्साह पाहायला मिळतो. मात्र यावर्षी या उत्सवावर कोरोनाचे सावट आलंय. मात्र तरीदेखील ग्रामिण भागातील अनेकजण आपली परंपरा टिकवून असल्याचे पहावयास मिळतंय. रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील अजय प्रकाश पारकर हे एक उत्साही कलाकार. रत्नागिरी खबरदार आयोजित मखर सजावट स्पर्धेत प्रत्येकवेळी पारितोषिक मिळवणारे म्हणून त्यांची ओळख. यावर्षी देखील त्यांनी पर्यावरण पूरक मखर सजावट केली आहे. नारळाच्या झावळांचा वापर करून त्यांनी गणपती बाप्पा साठी सूंदर असे मखर तयार केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
2:22 PM 24/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here