हातखंबा पंचायत समिती गणात अठराशे मास्क, ऑक्सीमीटरचे वाटप

0

रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हातखंबा पंचायत समिती गणात पंचायत समिती सदस्य साक्षी संतोष रावणंग यांनी अठराशे मास्क, ऑक्सीमीटरचे वाटप केले. मान. मंत्री श्री उदय सामंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. महेश म्हाप व तालुकाप्रमुख श्री. बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनानुसार पंचायत समितीच्या निवळी, हातखंबा, वेळवंड, कापडगाव, चरवेली गावांत अठराशे मास्क व ऑक्सीमीटरचे वाटप त्या गावातील वाडीप्रमुख, गावप्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून हे मास्क व ऑक्सीमीटरचे वाटप करण्यात आल्याचे रावणंग यांनी सांगितले. आपला जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालक-मालकांनाही मास्क वाटप करण्यात आले. रात्रंदिवस जनतेची सेवा करणाऱ्या आशासेविका, आरोग्यसेविका, पोलीस पाटील यांचा करोना योद्धा सेवा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 26-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here