‘संघावर दबाव पडू नये म्हणून धोनी करायचा तळाला फलंदाजी’, माजी वेगवान गोलंदाजाने केला खुलासा

0

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंह याने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकलेल्या धोनीला जगातील बेस्ट फिनिशर असल्याचे म्हटले. धोनी सारखे कौशल्य अन्य कोणत्याही फलंदाजात क्वचित आढळते. मात्र धोनीला स्वतःला नंबर चार वर फलंदाजी करायची होती. परंतु संघावर दबाव पडू नये म्हणून त्याने पाच किंवा सहा नंबरला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा आर.पी. सिंह याने केला. मना फिनिश करण्याबाबत धोनीसोबत ऑस्ट्रेलियाच्या मायकल बेवन याचेही नाव घेतले जाईल. मात्र धोनी नेहमीच त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे , असे आर. पी. सिंह याने म्हटले. धोनीने आपल्या कारकिर्दीत बहुतेकदा तळाला फलंदाजी केली. तो पाचव्या किंवा सहाव्या नंबरवर खेळायचा. मात्र एक फलंदाज म्हणून तो चौथ्या स्थानावर खेळला तेव्हा जास्त चांगली कामगिरी केली आहे. संघावर दबाव पडू नये म्हणून त्याने तळाला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण दबावात फलंदाजी करणारा त्यांच्यासारखा दुसरा दमदार फलंदाज नव्हता. तळाला खेळतानाही त्याने संघाला अनेक अशक्यप्राय लढती जिंकून दिल्या, असे आर.पी. सिंह म्हणाला. तसेच वर्ल्डकप जिंकूनही धोनी जमिनीवर राहणारा खेळाडू होता, असेही तो म्हणाला. दरम्यान, धोनीने नंबर चार फलंदाजी करताना 40 एक दिवसीय लढतीत 56.58 च्या सरासरीने 1358 धावा केल्या आहेत. तर 6 नंबरला खेळताना त्याने 156 लढतीत 47.31 च्या सरासरीने 4164 धावा आणि 7 नंबरला खेळताना 46 लढतीत 940 धावा चोपल्या आहेत. धोनीने आपल्या कारकिर्दीत एकूण 350 एक दिवसीय लढती खेळल्या आणि 10 शतकांच्या मदतीने 10773 धावा केल्या.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:12 PM 28-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here