महती राजाची : ११ वर्ष दोघांनी केली सेवा

0

ज्या पद्धतीने रत्नागिरीच्या राजाचे सोवळे दरदिवशी बदलले जाते त्याचप्रमाणे राजाच्या आसनाची स्वच्छता व दरबाराची स्वच्छता करण्याचे भाग्य या दोघांच्या नशिबी आले. दररोज न चुकता आनंद बंदरकर व मंदार आंब्रे हे दोघे राजाच्या आसनाची स्वच्छता व राजच्या दरबाराची स्वच्छता करीत आले आहेत रात्री ११ ते १ या वेळेत हि स्वच्छता केली जाते. तर रोज रात्री निर्माल्य गोळा करून त्या निर्माल्याचे विसर्जन बाळ्या पावसकर हे करीत आले आहेत. निर्माल्य विसर्जनासोबतच राजाच्या पूजेसाठी वापरले जाणारे साहित्य दररोज घासून-पुसून ठेण्याचे कार्य बाळ्या पावसकर यांनी केले.

(कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी गणेशोत्सवावर निर्बंध आले. याच पार्श्वभूमीवर श्री रत्नागिरीच्या राजाचा उत्सव यावर्षी न करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला. मात्र रत्नागिरी खबरदार या गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या उत्सवाच्या आठवणी शब्द सुमनांच्या रूपाने जागवणार आहे.)

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:15 AM 29/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here