महती राजाची : जनसागर लोटतो

0

११ दिवसांच्या मुक्कामानंतर अनंतचतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी राजाच्या उत्सवाची सांगता होते. ढोल ताशांच्या गजरात श्री रत्नागिरीच्या राजाची विसर्जून मिरवणूक मारुती मंदिर येथून सुरु होते. बघता बघता मोठा जनसागर या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतो. फटाक्यांची आतषबाजी ढोल ताशांचा गजर आणि राजाचा जयजयकार करीत मोठ्या दिमाखात राजाची मिरवणूक सुरु होते. या विसर्जन मिरवणुकीत विविध ठिकाणची ढोल पथके, पारंपारिक वाद्य आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे पारंपारिक कलाविष्कार यावेळी साऱ्यांना पहायला मिळतात. अत्यंत शिस्तबद्धपणे हि मिरवणूक माळनाका, जयस्तंभ मार्गे मुख्य बाजारपेठेतून मांडवी समुद्र किनारी दाखल होते. या दिवशी सर्वात मोठी गर्दी शहरात झालेली पहायला मिळते.

(कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी गणेशोत्सवावर निर्बंध आले. याच पार्श्वभूमीवर श्री रत्नागिरीच्या राजाचा उत्सव यावर्षी न करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला. मात्र रत्नागिरी खबरदार या गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या उत्सवाच्या आठवणी शब्द सुमनांच्या रूपाने जागवणार आहे.)

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:24 AM 31/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here