प्रणव मुखर्जी अनंतात विलीन

0

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सोमवारी सायंकाळी त्यांचं निधन झालं. आज (मंगळवारी) त्यांच्यावर राजकीय इतमामात आणि सैन्य सन्मानासोबत अंतिम निरोप देण्यात आला. प्रणव मुखर्जींच्या मेंदूवर नुकतीच शस्रक्रिया पार पडली होती. त्यातच ते करोना संक्रमितही आढळले होते. प्रणव मुखर्जी यांच्यावर करोना प्रॉटोकॉल पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत हा दुखवटा पाळण्यात येईल. या दरम्यान देशभरात अधिकृतरित्या कोणताही सरकारी कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:22 PM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here