‘या’ राज्यानं घातली ‘रमी’ अन् ‘पोकर’सारख्या ऑनलाईन गेमवर बंदी

0

नवी दिल्ली : नुकतीच डेटा सुरक्षेच्या कारणामुळं केंद्र सरकारनं चीनच्या पबजीसह 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी आणली. यानंतर आता देशातील एका राज्यानं मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेश सरकारनं रमी आणि पोकर अशा ऑनलाईन गेमवर गुरूवारी निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. सूचनामंत्री पी वेंकटरमैया यांनी असं सांगितलं की, मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळानं ऑनलाईन सट्ट्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेवटी माध्यमांसोबत बोलताना मंत्री म्हणाले की, ‘ऑनलाईन सट्ट्याच्या सवयीमुळं तरुणांचं लक्ष भरकटत आहे आणि त्यांना नुकसान पोहोचत आहे. तरुणांना वाचवण्यासाठी आम्ही अशा सर्व ऑनलाईन सट्ट्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.’ पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार ऑनलाईन सट्ट्याच्या आयोजकांना पहिल्यांदा अपराधी आढळल्यास 1 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. दुसऱ्यांदा दंडासह 2 वर्षांपर्यंत शिक्षा होईल. ऑनलाईन गेम खेळताना आढळल्यास 6 महिन्यांपर्यंत शिक्षा होईल.’ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here