आश्चर्य : रत्नागिरीत या गर्दीच्या ठिकाणी कोणीही पॉझिटिव्ह नाही

0

रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच आकडा वाढत चालला असल्याने प्रशासनाने तपासण्यांवर भर दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठेत मागील काही दिवसात करण्यात आलेल्या तपासणीत अनेक व्यापारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. मात्र धनजी नाका ते मच्छी मार्केट या रस्त्यावरील एकही व्यापारी पॉझिटिव्ह नसल्याचे आढळून आले आहे. या रस्त्यावर किराणामाल व भाजी या अत्यावश्यक सेवेतील दुकाने असल्याने लॉक डाऊनच्या पहिल्या दिवसापासून येथील सर्व दुकाने उघडी होती. मात्र आजवर या रस्त्यावरील कोणत्याही व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही. नेहमी वर्दळ आणि गर्दी असणाऱ्या या रस्त्यावरील ५० दुकानदारांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली असता यामध्ये एकही पॉझिटिव्ह न आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:02 PM 11/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here