कोव्हीड योध्दा आणि उत्कृष्ट संस्था म्हणून संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचा गौरव

0

एनजीओ चा एकाच दिवशी सन्मानाची हॅटट्रिक…

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात संकल्प युनिक फाउंडेशन एनजीओ ही सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य करीत आहे. विशेष म्हणजे कोरोना कालावधीत या संस्थेच्या वतीने जे कार्य झाले आहे आणि होत आहे ते उल्लेखनीय असून अशा संस्थांना आणि त्यांच्या सर्व सदस्याना मानसिक बळ देणे गरजेचे आहे.निव्वळ याच हेतूने आम्ही आज या संस्थेचा सन्मान करीत आहोत, असे उदगार नॅशनल एज्युकेशनल अॅड वेल्फेअर सोसायटी चे उपाध्यक्ष मन्सूर काझी यांनी काढले. समाजामध्ये काम करीत असताना कोरोना सारख्या जीवघेणा आजारांमध्ये या संस्थेच्या सदस्यांनी जे काम केले आहे, आणि करीत आहेत त्यांची जाणीव समाजाला होणे गरजेचे आहे.या संस्थेने सर्वांसमोर मानवतेचा एक नवीन आदर्श ठेवला असल्याची प्रतिक्रिया युनिक मरीन एजन्सी रत्नागिरी चे सहायक संचालक मोहम्मद सहल मुनीर कर्लेकर यांनी व्यक्त केली तसेच जमीयत उल्मा ए हिंद रत्नागिरी या संस्थेच्या वतीने ही एनजीओ चा सन्मान करण्यात आला. यावेळी युनिक मरीन एजन्सी रत्नागिरी, नॅशनल एज्युकेशनल अॅड वेल्फेअर सोसायटी,जमीयत उल्मा ए हिंद या तीन संस्थांचे पदाधिकारी,तसेच शफी काझी,शौकत काझी, मुईन सर, मन्सूर काझी आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एनजीओ चे अध्यक्ष दिलावर कोंडकरी उपाध्यक्ष शकील गवाणकर, कांचन मालगुंडकर,तसेच ईस्माइल नाकाडे,नाझीम मजगावकर ,राजू भाटलेकर आदींनी हा सन्मान स्वीकारून या तीन ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:49 PM 15-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here