शहरातील नागरीकांना विना व्यत्यय रोज पाणी मिळणार : ना.उदय सामंत

0

◼️ शहरात पाणी पुरवठ्यासाठी नव्या जनरेटरची सुविधा – उद्घाटन संपन्न

➡ रत्नागिरी : शहरातील नागरीकांना विना व्यत्यय पिण्याचे पाणी मिळणार असून शीळ धरणाच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर अनेकदा पाणी पुरवठा खंडित होत होता. गेली अनेक वर्षाचा हा प्रश्न प्रलंबित होता. रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये शिवसेना पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून काम करु लागल्यानंतर शहरातील अनेक मुलभूत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीकोनाने काम करत आहे यापैंकीच एक म्हणजे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी शीळ धरणाच्या येथे पाणी पुरवठा खंडित होऊ नये म्हणून जनरेटरची गरज असल्याचे लक्षात घेऊन हे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी विशेष लक्ष दिले.
रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेतील कामात राजकारण आणले जात होते.
नगरपरिषदेला काहीजण बदनाम करत होते परंतू ही पाणीपुरवठा योजना उशीरा होण्यास हेच राजकारणी कारणीभूत असून रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी हे चांगले काम करत असून आता रत्नागिरी शहरामध्ये पाणी पुरवठा खंडित होणार नाही. नगरपरिषदेने शीळ धरणाच्याठिकाणी उत्तमप्रतिचा जनरेटर बसविलेला असून त्याचे उद्घाटन झाल्याचे ना.उदय सामंत यांनी सांगितले. तसेच नव्याने सुरु असणारे या पाईपलाईनसाठी 2 पंप असून अजून 3 पंप घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर उद्घाटन मा.ना.श्री.उदय सामंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष बंड्या साळवी, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, नगरसेवक निमेश नायर, बंटी किर, बाबा नागवेकर, वसंत पाटील, उपजिल्हाप्रमुख तसेच आरोग्य सभापती बाबू म्हाप, मुन्ना देसाई, नितीन तळेकर, दिनेश सावंत, प्रांताधिकारी श्री.सुर्यवंशी, मुख्याधिकारी श्री.ठोंबरे आदि मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
04:42 PM 15/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here