दापोली : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडू लागले आहेत. दापोली येथील प्रियांका अरूण भुवड (वय २३, रा. आझादवाडी, गिम्हवणे) हिच्या मोबाईलवर दीपक शर्मा नामक तोतयाने बँक ऑफ बडोदा शाखा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, केवायसी ऑफिस या नावाने कॉल व एसएमएस केले होते. मुंबईतून बँकेचे वरिष्ठ अधिकारी बोलतायत असे समजून त्या भामट्याने विचारलेली माहिती भुवड यांनी दिली. भुवड यांच्या बँक खात्याची माहिती करून घेत त्यांच्या खात्यातील २९ हजार ९९६ रूपये लंपास केले. खात्यातून पैसे गेल्यानंतर आपली फसवणूक झाली हे भुवड यांच्या लक्षात आले. फसवणुकीची हि घटना शनिवार दि. १२ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रियांका अरुण भुवड यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक शर्मा नामक भामट्याविरोधात भादंविक ४१९, ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ क, ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:02 AM 16-Sep-20