चिपळूण: पूर्व विभागात अॅन्टीजेन चाचणी कॅम्प आयोजित करणार : आ. निकम

0

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील पूर्व विभागातील अलोरे, सती, पिंपळी या भागातील ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, अशी कोरोनाची लक्षणे असतील अशांसाठी लवकरच पाच दिवसांसाठी अॅन्टीजेन चाचणी कॅम्प आयोजित केला जाईल, अशी माहिती चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी दिली. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्यावतीने सोमवारी पिंपळी, सती, खेर्डी आदी पूर्व भागातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक आ. शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सती-चिंचघरी विद्यालयात झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस डॉ. राकेश चाळके, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दाभोळकर, डॉ. अजित दाभोळकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यासह २६ डॉक्टर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here