भाजपकडून कुंभार्ली शाळेचा परिसर स्वच्छ

0

चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहानिमित्त भारतीय जनता पक्ष चिपळूण तालुक्यातर्फे पोफळी पंचायत समिती गणातील कुंभार्ली येथील जिल्हा परिषद शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. हे स्वच्छता अभियान भाजपचे चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने वाढलेले गवत, झाडांचा पालापाचोळा स्वच्छ करण्यात आला. यावेळी कुंभार्ली येथील भाजपचे तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, कुंभार्ली बूथ अध्यक्ष विजय सातपुते, शशिकांत लब्धे यांनी हे स्वच्छता अभियान राबविण्यासाठी विशेष मेहनत घेतली. या स्वच्छता अभियानात जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुगंधा ताम्हणकर, तालुका उपाध्यक्ष संजय पंडव, शिरगाव बुथ अध्यक्ष मधुकर फके, कोंडफसवणे बुथ अध्यक्ष राजेंद्र जाधव, आतिश सोनकर, कामगार आघाडीचे शैलेश लब्धे, बाबू रेमजे, सचिन ताम्हणकर, सुनिता जाधव, साक्षी ताम्हणकर, लक्ष्मी करंजकर, शमिका झुंजत, अभय सुतार आदी सहभागी झाले होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:06 PM 18-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here