दुचाकी शिकताना पडून जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

0

रत्नागिरी : दुचाकी शिकत असताना दुचाकी घसरून छातीला व पोटाला मार लागलेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मुंबई येथील केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यातून कागदपत्रे प्राप्त झाल्यावर गुरुवारी रात्री पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रुती राजेंद्र पवार (वय १७, रा. चांदोर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत तिचे वडील राजेंद्र नारायण पवार(४५, रा. चांदोर, जि. रत्नागिरी) यांनी पोलिसांना खबर दिली. २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास त्यांची मुलगी श्रुती घराच्या परिसरातच त्यांच्या समोर अॅक्टिव्हा दुचाकी शिकत होती. त्यावेळी दुचाकी घसरली आणि श्रृती बाजुलाच असलेल्या मोठ्या दगडावर पोटावर पडली. तिला दुखापत झाल्याने प्रथम रत्नागिरीतील येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अधिक उपचारांसाठी २८ ऑगस्ट रोजी मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान तिचा ३० ऑगस्ट रोजी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार चव्हाण करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:42 PM 19-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here