आयुषमान कोव्हिड केअर सेंटरचे लांजात उद्घाटन

0

लांजा : लांजातील डॉ. स्वरूप एकलुरे, डॉ. प्रशांत कुळकर्णी यांनी शासनमान्य आयुषमान कोव्हिड केअर सेंटर सुरू केले असून यामुळे लांजा तालुक्यातील कोरोनाबाधितांना सुविधा उपलब्ध झाली आहे. या शासनमान्य आयुषमान कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन प्रभारी तहसीलदार उज्वला केळुसकर यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. एकलुरे हॉस्पिटलच्या मागे गोंडेसखल रस्त्याला आयुषमान कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. लांजा शहरातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांनी हे सेंटर उभारण्यासाठी स्वमालकीची इमारत वापरण्यास दिली आहे. शासनमान्य असलेले हे कोव्हिड सेंटर असून यामुळे लांजा तालुक्यातील जनतेला सुविधा उपलब्ध झाली आहे. या उद्घाटन प्रसंगी नायब तहसीलदार मनोहर कदम, लांजा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती कोरे, लांजा पोलिस उपनिरीक्षक पाटील, सामाजिक कार्यकर्ते महम्मद रखांगी, शिवाजी कोत्रे, सचिन माजळकर, डॉ. श्रीपाद एकलुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:07 PM 22-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here