दिलासादायक : देशात २४ तासांत तब्बल एक लाख रुग्णांची कोरोनावर मात

0

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल एक लाख रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. तर कालच्या दिवसभरात नव्या रुग्णांच्या संख्येतही घट दिसून आली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे ७५ हजार ०८३ नवे रुग्ण सापडले आहेत. तर काल दिवसभरात तब्बल एक लाख एक हजार ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ लाख ९७ हजार ८६७ एवढी झाली आहे. तर देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ९ लाख ७५ हजार ८६१ एवढी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 22-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here