रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० या अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षा दि. १ ऑक्टोबर तर दि. १७ ऑक्टोबर पासून पदव्युत्तर विभागाची परीक्षा होणार आहे. बॅकलॉगच्या परीक्षा दि. २५ सप्टेंबर पासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी याबाबतची अधिक माहिती महाविद्यालयाच्या www.resgjcrtn.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या विभागप्रमुखांशी संपर्क करावा, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:45 PM 23-Sep-20