भाजपच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

0

दापोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सेवा सप्ताहानिमित्त बुरोंडी जि.प. गटातील दाभोळ येथे भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता जावकर यांच्या निवासस्थानी रक्तदान शिबिर झाले. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर झाले. शिबिरासाठी सुमारे ९० इच्छुक रक्तदाते आले होते; मात्र रक्तपेढीची क्षमता ५० बॅगचीच असल्याने केवळ ५० जणांना रक्तदान करता आले. पुन्हा ऑक्टोबर महिन्यात रक्तदान शिबिर आयोजित करू, असे रक्तपेढीच्या टीमने आश्वासन दिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्मिता जावकर, केदार साठे, भाऊ इदाते, उदय जावकर, योगेश सुर्वे, मंगेश तांबट, अमोल तवसाळकर आदींनी परिश्रम घेतले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:50 AM 28-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here