आठवलेंची खडसेंना आरपीआयमध्ये येण्याची ऑफर

0

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का अशी चर्चा सुरु असतानाच यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खडसेंना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा आरपीआयमध्ये यावे. आपण आपले सरकार आणूया असं आवाहन रामदास आठवलेंनी खडसेंना केलं आहे.

दरम्यान, खडसेंना राष्ट्रवादीतच जायचं असेल तर त्यांनी आधी जायला हवं होत. तेव्हा गेले असते तर आता मंत्री झाले असते. परंतू आता राष्ट्रवादीत आता सगळं फुल असल्याचं आठवले म्हणाले होते. त्यामूळे खडसे भाजप सोडून कोणत्या पक्षात जाणार का? आठवलेंची ऑफर स्वीकारणार का? यावरही चर्चा सुरु झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:03 PM 07-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here