अमेरिकेचे जेष्ठ मंत्री स्टीफन बिगुन दोन दिवसीय भारत दौ-यावर

0

वॉशिंग्टन : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार सहमंत्री आणि सहसचिव स्टीफन बिगुन दोन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. 12-14 ऑक्टोबर या काळात स्टीफन बिगुन भारत सरकारच्या अनेक जेष्ठ आणि प्रमुख अधिका-यांची भेट घेणार आहेत. यासोबत भारत-अमेरिका फोरमला संबोधीत करणार आहेत. स्टीफन बिगुन यांच्या आगामी भारत दौ-यात भारत-अमेरिका संबंध वृद्धिंगत करणे, जागतिक सामरिक भागीदारी आणि दोन्ही देशा कशाप्रकारे शांती, समृद्धी तसेच भारत-प्रशांत महासागर परिसरात आणि जागतिक स्तरावर अन्य क्षेत्रात सोबत कार्य करतील यावर प्रामुख्याने मंथन,चर्चा आणि संवाद होणार आहे असे अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जाहीर निवेदनात नमूद केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:26 PM 10-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here