उत्तर कोरियाने बनवले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र

0

◼️ डोनाल्ड ट्रम्प संतप्त..?

उत्तर कोरियाने एक असे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र बनवले आहे, ज्याने ते अमेरिकेतील कोणत्याही शहरावर निशाणा साधू शकतात. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनुसार, शनिवारी सैन्य परेड दरम्यान नवीन ‘इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक’ हे क्षेपणास्त्र सादर करण्यात आले. उत्तर कोरियाच्या नवीन शक्तिशाली क्षेपणास्त्र परेडची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाले आहेत. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाचे नवीन क्षेपणास्त्र इतके सक्षम आहे की, ते अमेरिकेच्या कोणत्याही भागात हल्ला करू शकते. उत्तर कोरियाचे हे क्षेपणास्त्र जगातील सर्वात मोठे रोड मोबाईल क्षेपणास्त्र असू शकते. vox.com च्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या नवीन क्षेपणास्त्र परेडची माहिती मिळाल्यानंतर ट्रम्प संतप्त झाले आहेत. मात्र अद्याप यावर त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, वर्कर्स पार्टीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे भव्य लष्करी परेड आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोणत्याही परदेशी व्यक्तीस उपस्थित राहण्याची किंवा फोटो घेण्याची परवानगी नव्हती. या परेडमध्ये उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन ही उपस्थित होता. किमच्या उपस्थित हे क्षेपणास्त्र सादर करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:40 PM 12-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here