पावसामुळे जिल्ह्यात ठिकठीकाणी नुकसान

0

रत्नागिरी : जिल्हाभरात पडणाऱ्या पावसामुळे ठिकठीकाणी नुकसान झाले आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल पुढीलप्रमाणे.

◼️ खेड : मौजे पन्हाजे येथील रस्ता पावस्मुळे खचला असून येथून एकेरी वाहतूक सुरळीत सुरु आहे.

◼️ चिपळूण : मौजे चीवेली येथील शंकर बापू मांजलेकर यांच्या वाड्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. चीचघर-कोरेगाव-भैरवली रस्ता पावसामुळे खचला आहे. या ठिकाणी देखील एकेरी वाहतूक सुरु आहे. दाभीळ-सातवीगाव-आयणी रस्त्यावर पावसामुळे पाणी आल्याने रस्ता खराब झाला आहे. या ठिकाणी देखील एकेरी वाहतूक सुरु आहे.

◼️ संगमेश्वर : सोलकर वाडी येथील जयराम गोपाळ हसम यांच्या घरावर वीज पडून घराचे नुकसान झाले आहे. घरातील ८ जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मौजे कडवई येथील श्रीम. सुनंदा गौराजी कांबळे यांच्या घराचे ३७५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

◼️ राजापूर : चिखलगाव येथे ५ घरे, ५ गोठे, दुकान यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. तसेच धोपेश्वर येथे १ घर १ गोठा यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:10 PM 15/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here