मुंबई : राज्यात कोरोनाचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. कोरोनामुळे सर्व सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होणार याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण व्यासपीठावरूनच होईल, असे संजय राऊत म्हणाले आहेत. दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होणार आहे. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून कार्यक्रम पार पाडता येईल, अशा पद्धतीनं नियोजन करण्यात येईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:51 PM 17-Oct-20