चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून चिपळूण पोलिसांनी दोन दुचाकींसह ५३ हजार ३१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगार खेळत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून राजेंद्र कृष्णा चव्हाण, सुबोध रामचंद्र सकपाळ, रवींद्र रामचंद्र आंब्रे, कुमार सनातन रॉय, अनिल भिवा साबळे, योगेश परशुराम शिर्के यांच्यावर गुन्हा दाखल केला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:42 PM 19-Oct-20