कुवारबाव येथे मनोरुग्ण महिलेकडून दगडफेक

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव येथे सोमवारी सकाळी भरबाजारपेठेत दगडफेक करणाऱ्या मनोरुग्ण महिलेला प्रसंगावधान राखत समाजसेवकांनी शांत केल्याने पुढील अनर्थ टळला, कुवारबाव येथील समता हॉटेलसमोर या मनोरुग्ण महिलेने दगड मारण्यास सुरुवात केली. ती येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकींवर दगड मारु लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान ही माहिती मिळताच तेथील जागरुक नागरिक जयप्रकाश प्रभू यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांना फोन करुन माहिती दिली. दरम्यान, ही माहिती मिळताच सचिन शिंदेनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जयप्रकाश प्रभू यांच्या सहकार्याने पुढील सर्व कारवाई करत कठीण प्रसंगातून मार्ग काढला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:49 PM 21-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here