रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाची दुरवस्था

0

रत्नागिरी : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग १६६कडे पाहिले जाते. कोल्हापूरहून कोकणात होणारी बहुतांश वाहतूक रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरून होते. २४ तास सुरू असणारा हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर या संपूर्ण महामार्गाची दुरवस्था झाली आहे. १३१ किलोमीटरच्या प्रवासात प्रवाशांना जवळपास हजार खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. काही खड्डे १५ ते २० सेंटीमीटर खोल गेले आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे जोखमीचे बनले आहे. याचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम अत्यवस्थ रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्ण वाहिकांना बसत आहे. याकडे संबधितांनी वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:36 PM 23-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here