आजच्या कॅबिनेट बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

0

मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळाची आज कॅबिनेट बैठक झाली असून, या बैठकीत 7 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मुदत संपलेल्या व कोरोना विषाणू संक्रमणामुळे निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अध्यादेश काढण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच शिवभोजन थाळीचा दर 01 ऑक्टोबर 2020 पासून पुढील 6 महिन्यांसाठी 5 रुपये करण्यास मान्यता दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी मार्च महिन्यापर्यंत 5 रुपयांत पुरवण्याचा निर्णय झाला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी कांदा उत्पादकांशी चर्चा करुन तोडगा काढतील, अशी माहितीही भुजबळ यांनी प्रसारमध्यांना दिली. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादा भुसे आणि नाशिकमधील कांदा उत्पादक, शेतकऱ्यांची चर्चा सुरु आहे. यावेळी कांदा उत्पादकांकडून साठवणुकीवरील मर्यादा हटवण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.

विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्याच्या प्रस्तावावर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रस्ताव आला, तो‌ एकमताने मंजूर झाला, असे भुजबळ यांनी सांगितले.

ठाकरे मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे नियम

◼️ शिवभोजन थाळीचा दर 01 ऑक्टोबर 2020 पासून पुढील 6 महिन्यांसाठी 5 रुपये करण्यास मान्यता.
◼️ मुदत संपलेल्या व कोरोना विषाणू संक्रमणामुळे निवडणूका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविणार. अध्यादेश काढण्यास मान्यता
◼️ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करणार
◼️ राज्यातील रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व औरंगाबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पाकरिता विशेष प्रोत्साहने देण्यास मान्यता.
◼️ राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यासाठी मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना
◼️ धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द, नव्याने निविदा मागविणार
◼️ मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:48 PM 29-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here