शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते?, संजय राऊतांचा विरोधकांना टोला

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते, तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतात असाच आरोप केला जात होता. जेव्हा तीन पक्षांचे सरकार असते, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करतात. तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन, सल्ला देतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असतील तर कुणाला पोटदुखी का होते? असे संजय राऊत म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सरकार राहिले नाही. तर त्यांना पण अभ्यास करता आला असता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लक्ष घालावं. यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मोदींकडे या प्रश्न घेऊन जावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात जाऊ, असेही संजय राऊत म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:05 PM 31-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here