शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोव्हिड योद्धांचा सत्कार

0

संगमेश्वर : शिवसेना सहसंपर्क प्रमुख, मा. जिल्हा प्रमुख आदरणीय श्री राजेंद्र महाडिक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र फुणगुस येथे कोव्हिड योद्धांचा सन्मान पार पडला. साधारणपणे १९९२ पासून खऱ्या अर्थाने कार्यकर्तांच्या ईच्छेनुसार राजकीय वाढदिवसाची सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत वाढदिवस साजरा करण्यात येतो. परंतू या वेळी कोव्हिडचे संकट असल्यामुळे हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करणाचा मानस उपतालुका प्रमुख घाणेकर साहेब यांनी केला. त्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र फुणगुस येथे ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या आशा तसेच आरोग्य सेवक डॉक्टर यांना ‘कोव्हिड योद्धा’ सन्मानपत्र तसेच तुळशीच रोप भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जि प सदस्सा सौ. रचना महाडिक, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रायबोले, खाडी विभाग प्रमुख महेश देसाई, पंचायत समिती सदस्य परशुराम वेल्ये, उपविभाग प्रमुख अशोक पांचाळ, उपविभाग संघटक दिपक शिंदे, महीला उपविभाग संघटक पुनम देसाई, फुणगुस सरपंच सांची भोसले, उपसरपंच सुजीत शिगवण, शाखाप्रमुख विश्वास वेद्रे आणि खाडी विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:51 PM 31-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here