राज्यात अकरावीचे ऑनलाईन वर्ग आजपासून सुरु, 61 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

0

मुंबई : अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आज 2 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया ऑनलाईन वर्गासाठी राज्यभरातून 60 हजार 360 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात सायन्स शाखेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तसेच पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

इतर इयत्तांच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अकरावीच्या विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्ग घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून आज 2 नोव्हेंबरपासून या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला सुरूवात होणार आहे. सायन्स, काॅमर्स, आर्ट्स शाखेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग मराठी व इंग्रजी माध्यमातून भरणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

शाखानिहाय नोंदणी

  • आर्ट्स (मराठी) 4527
  • आर्ट्स (इंग्रजी) 2337
  • काॅमर्स (मराठी) 5355
  • काॅमर्स (इंग्रजी) 12,956
  • सायन्स 35,185

नावनोंदणीसाठी लिंक – https://covid19.scertmaha.ac.in/eleventh

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:49 AM 02-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here