ना. जयंत पाटील ७ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर

0

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील दि. ७ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते उत्तर रत्नागिरीतील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून सावर्डे येथे तालुकानिहाय कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत सावर्डेतील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात या बैठका होतील. यावेळी मंडणगड, खेड, दापोली, गुहागर, संगमेश्वर व चिपळूण या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. या बैठकांना जिल्हा कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, जि.प., पं. स. सदस्य, नगरसेवक आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:48 AM 05-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here