चोरट्याने मारला कांद्यांवर डल्ला

0

जालगाव : दापोली शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कांदा-बटाटे विक्रीच्या दुकानात चोरट्याने डल्ला मारला असून सुमारे १८ हजार ५०० रु. किमतीचे कांदे व अन्य साहित्य लंपास केल्याची घटना दि.८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. सध्या बाजारात कांदा व बटाटा याना चागले भाव आहेत. त्यामुळेच आता चोरट्यांनी याकडे आपला मोर्चा वळविलेला दिसतो. दापोली ते हर्णे रोडवर मेहता पेट्रोल पंपासमोर प्रवीण शेट (रा. पोस्ट गल्ली, दापोली) यांचे कांदा बटाट्याचे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास दुकानातील हातगाडी व त्यावर कांद्याच्या गोणी, वजन काटा व अन्य साहित्य असा सुमारे १८ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य पळविले. या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड हे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:56 PM 10-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here