रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती बंद करा : वाहनचालकांची मागणी

0

◼️ जिल्ह्यात इतरत्र हेल्मेट सक्ती नसताना केवळ रत्नागिरीतच का ?

रत्नागिरी : शहरात दुचाकी घेऊन फिरताना दुचाकीचालकांना हेल्मेट परिधान करणे अत्यंत अडचणीचे ठरत असल्याने शहरात हेल्मेट सक्ती नको अशी मागणी दुचाकीचालकांकडून होत आहे. शहरामध्ये काम करताना अनेक ठिकाणी गाडीवरून उतरावे लागते, अनेक व्यवहार करताना ते सांभाळत फिरावे लागते यामुळे हेल्मेट अडचणीचे ठरत आहे. हेल्मेट नसल्यास वाहतूक पोलिसांचा ५०० रुपये दंड सध्याच्या कडकीच्या दिवसांत अनेकांना परवडत देखील नाही. संपूर्ण जिल्ह्यात कुठेही हेल्मेटसक्ती नसताना केवळ रत्नागिरीतच ती का ? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. आता या नागरिकांच्या बाजूने काही राजकीय पक्ष व समाजिक संघटना देखील या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:26 AM 11/Nov/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here