आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

0

रत्नागिरी : तालुक्यातील रनपार येथे आजाराला कंटाळून प्रौढाने राहत्याघरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ वा. सुमारास उघडकीस आली. प्रसाद प्रभाकर सुर्वे (५३, रा. रनपार सुर्वेवठार, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत नितीशा नितीन सुर्वे(४२, रा. रनपार सुर्वेवठार, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, प्रसाद सुर्वे त्यांच्याच वाडीत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. या आजारपणालाच कंटाळून त्यांनी सोमवारी राहत्या घराच्या वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पूर्णगड पोलीस अधिक तपास करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:31 PM 19-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here