बिहारचे शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांचा राजीनामा

0

पाटना : बिहारचे नवे शिक्षणमंत्री मेवालालाल चौधरी यांनी आपल्या पदाची राजीनामा दिला आहे. आजच त्यांनी शिक्षणमंत्री पदाचा पदभार स्वीकारला होता. मेवालाल यांच्यावर कृषी विद्यापीठात कुलगुरू असताना झालेल्या नियुक्तीतील घोटाळ्याचा आरोप आहे. माजी आयपीएस अधिकारी अमिताभ दास यांचा आरोप आहे की, मेवालाल यांची पत्नी माजी आमदार नीता चौधरी यांचा मागील वर्षी झालेल्या संशयास्पद मृत्यूचे धागेदोरे या नियुक्ती घोटाळ्याशी संबंधित असू शकतात. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अमिताभ दास यांनी पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले आहे.

4 वर्षांपूर्वी जानेवारी 2016 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. मेवालाल भागलपूर कृषी विद्यापीठात कुलगुरु असताना 2012 मध्ये कृषी वैज्ञानिक, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती होणार होती. 281 पदांसाठी जाहिराती निघाली होती, परीक्षेनंतर 166 जणांची नेमणूक करण्यात आली. यानंतर घोटाळ्याचे आरोप झाले आणि ज्याला कमी मार्क मिळाले उमेदवार उत्तीर्ण झाले. तर ज्याला जास्त मार्क मिळाला तो नापास झाले, असा हा घोटाळा होता.

मेवालाल यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षाने पुन्हा एकदा नितीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. राजद नेते नवल किशोर सिंह यांनी एबीपी न्यूजला सांगितले की नितीशकुमार हे रबर स्टॅम्प मुख्यमंत्री झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील पक्ष असूनही त्यांना मुख्यमंत्री केले गेले आहे. भाजप भ्रष्टाचाऱ्यांची सोबत करत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:29 PM 19-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here