दुचाकीस धडक दिल्याने कार चालकावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : चाफेरी येथे बेदरकारपणे इनोव्हा गाडी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीस धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार रोजी सकाळी ६.१५ वा. सुमारास घडली. सुधीर चंद्रकांत चव्हाण (४७, रा. मिरजोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित इनोव्हा चालकाचे नाव आहे. अनिकेत हातखमकर यांनी तक्रार दाखल केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:08 PM 03-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here