मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री सकारात्मक : खासदार संभाजीराजे

0

मुंबई : इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सुपर न्युमररी म्हणजेच शिक्षण आणि नोकऱ्यांत अधिसंख्य जागा देण्याबाबत तसेच नियुक्त्यांबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्रिमंडळातील त्यांचे सर्व सहकारी पूर्णपणे सकारात्मक आहेत. राज्य सरकार त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन या प्रश्नावर लवकर निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीदरम्यान दिल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून बुधवारी ‘वर्षा’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला खासदार संभाजीराजे, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील हेदेखील उपस्थित होते. संध्याकाळी सवासहा वाजता सुरू झालेली ही बैठक तब्बल तीन तास सुरू होती.

मराठा आरक्षणविषयक सर्वच मुद्दय़ांवर यात चर्चा झाली. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सुपर न्युमररी म्हणजेच अधिसंख्य जागा देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच त्यांचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी पूर्णपणे सकारात्मक आहेत. याबाबत ते कायदेशीर सल्ला घेणार आहेत. सरकार दिल्लीतील मराठा आरक्षणाचा विषय हाताळणाऱया ज्येष्ठ विधिज्ञांशीही चर्चा करणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या नियुक्त्यांबाबत तसेच एमपीएससीपासून सर्वच विषयांबाबत चर्चा झाली आहे. नियुक्त्यांबाबतही आपण लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिल्याचे खासदार संभाजीराजे म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:13 AM 03-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here