अभाविपच्या कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन

0

रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रत्नागिरीतील नव्या कार्यालयाचे उद्घाटन येत्या सोमवारी (दि. ७ डिसेंबर) होणार आहे. जिल्ह्यात अभाविप १९६४-६५ सालापासून कार्यरत आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आजगावकरवाडी येथे १९९० सालापासून अभाविपचे संपर्क कार्यालय आहे. आता जिल्ह्यातील कामाच्या अधिक सक्रियतेसाठी तसेच नवनवे प्रकल्प हाती घेता यावेत, यासाठी अभाविपची कार्यालय नव्या हक्काच्या वास्तूमध्ये सुरू होत आहे. फ्लॅट क्र. सुहास प्लाझा, इन्फिगो आय केअर हॉस्पिटलजवळ, साळवी स्टॉपच्या कमानीजवळ, रत्नागिरी हा नव्या कार्यालयाचा पत्ता आहे. भाजपाचे राष्ट्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होईल. उद्घाटन समारंभानिमित्ताने शिवाजीनगर येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कोकण विद्यार्थी निधी ट्रस्टचे सचिव स्वप्नील सावंत आणि अध्यक्ष सीए मंदार गाडगीळ यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:28 PM 05-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here