रत्नागिरी : तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या राजू नारायणलाल खारोल (रा. भिलवाडा राजस्थान) याच्या विरोधात जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील वाटद खंडाळा येथे ही घटना घडली. वाटद येथे राहणाऱ्या तक्रारदार यांच्या तेरा वर्षीय मुलीला शेजारी राहणाऱ्या राजु यांने २२ नोव्हेंबर रोजी फुस लावून पळवून नेले. यावेळी त्यांच्या घरात कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा राजूने उठवला. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजू खारोल याच्या विरोधात भादविक ३६३ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 05-Dec-20