संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी एनजीओ चा मानवतेचा सन्मान

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काम करीत असलेल्या एनजीओ ला आज ह्युमन डे चे औचित्य साधून समाजातील सर्व घटकांना जो सतत मदतीचा हात देतात ही भावना लक्षात घेवून सन्मान करण्यात आला. रत्नागिरी येथील माध्यमिक शाळा सहकारी पतपेढी यांचे सभागृहात आज ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व गुन्हे नगरी यांचे वतीने सन्मान करण्यात आला. कोरोना कालावधीत केलेल्या कामाची प्रशंसा या संस्थेच्या वतीने करण्यात आली.एनजीओ रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मानव अधिकार दिवसानिमीत्ताने हा सन्मान करण्यात आला.यावेळी एनजीओ चे उपाध्यक्ष शकील गवाणकर, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर, रुग्ण मदत केंद्र प्रमुख ईस्माइल नाकाडे, जिल्हा संघटक जमीर खलफे, सल्लागार व आशादीप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप रेडकर यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष शकील गवाणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून भविष्यात ही आमचे कार्य हे असेच चालू राहिल असे सांगून आज जो सन्मान करण्यात आला आहे तो आमच्या एनजीओ च्या सर्व सदस्यांचा आहे असे सांगितले. या कार्यक्रमाला राज्यातून असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:45 PM 11-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here