आडिवरेत घरफोडी; दीड लाख रुपये लांबवले

0

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथील संदीप जैतापकर यांचे बंद घर फोडून अज्ञाताने रोख १ लाख ८४ हजार रुपये लांबवल्याप्रकरणी साखरीनाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ११ डिसेंबर रोजी रात्री ९ वा. कालावधीत घडली आहे. याबाबत संदीप पशुराम जैतापकर (४६, रा. कालिकावाडी-आडिवरे, राजापूर) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार फणसेकर करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:50 PM 14-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here