मांसाची बेकायदा वाहतूक करणारे सहाजण ताब्यात; दोन हजार किलो मांस जप्त

0

मंडणगड : येथील पोलिस ठाण्यासह बाणकोट सागरी पोलिस ठाणयाच्या संयुक्त कारवाईत दोन हजार किलो मांस तसेच त्याची बेकायदा वाहतूक करणारे सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सहाजणांसह दोन हजार किलो मांस व दोन गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. म्हाप्रळ येथील तपासणी नाक्यावर पोलिस निरीक्षक उत्तम पिठे, पोलिस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या नेतृत्वाखाली पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जप्त करण्यात आलेले प्राण्याचे मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, हे प्रामाणित करण्यास पोलिसांना फॉरेन्सिक लॅबची मदत घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने कारवाईसही पोलिसांनी प्रारंभ केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितामध्ये अकिब शेख (चेंबूर) शाहीद युसूफ कुरेशी (गोवंडी) मोहमंद आदम कुरेशी (कुर्ला) इरफान कुरेशी (गोवंडी) मुजाहीद अब्दुल रेहमान शेख (गोवंडी), अजमल अकलाख पेटकर पिंपळोली) यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ४२९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम (५) (ब) (९अ) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:49 PM 14-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here