रत्नागिरी एसटी स्टँड बांधकामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ दूर करा : अॅड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : भाजपा शिष्टमंडळाने आज रत्नागिरी विभाग नियंत्रक एसटी महामंडळ श्री. भोकरे साहेब यांची भेट घेतली. त्यावेळी एका महिन्याच्या आत समोरील बस थांब्यासाठी निवारा शेड उभारा अशी आग्रही मागणी करण्यात आली. तसेच दोन वर्षात केवळ १५ टक्के काम करणाऱ्या कंत्राटदाराला कामावरून हटवा, शीघ्रगतीने नवीन स्टँडचे बांधकाम पूर्ण करा हा विषय गांभीर्याने घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी आग्रही मागणी श्री. भोकरे साहेब यांच्याकडे करण्यात आली. शहरातील मध्यवर्ती रस्त्यातील वाहतुकीवर ताण पडत आहे. नागरिकांना होणारा त्रास, वाहतूक कोंडी या सर्व गोष्टी गांभीर्याने घेऊन तात्काळ कारवाईची मागणी शिष्टमंडळाने केली. निवारा शेडबाबत या महिन्याच्या आत निवारा शेड उभारणी पूर्ण होईल तसेच ठेकेदारा संदर्भात वरिष्ठांना तात्काळ याबाबत अवगत करतो असे विभाग नियंत्रकांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले. भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली श्री.सचिन वहाळकर सरचिटणीस, श्री. सचिन करमरकर शहराध्यक्ष, श्री. विजय सालीम जिल्हा चिटणीस, श्री. बाबू सुर्वे शहर सरचिटणीस, श्री.राजू किर, श्री.अशोक वाडेकर तालुकाध्यक्ष, श्री.विक्रम जैन युवामोर्चा उपाध्यक्ष सह प्रवक्ते यावेळी हजर होते.

लॉकडाऊन कालखंडात बंद झालेल्या गाड्या सुरू करण्याची मागणी भा.ज.पा. शिष्टमंडळाने केली. यावर बहुतांशी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत अशी माहिती देण्यात आली. त्यावर शिष्टमंडळाने असहमती व्यक्त करत बेस्टकडे पाठवलेले ४०० च्यावर कर्मचारी, १०३ गाड्या तात्काळ जिल्ह्यात परत बोलावण्याची मागणी भा.ज.पा. शिष्टमंडळाने केली. रत्नागिरीतील प्रवासी वाहतुकीवर इथले वाहक-चालक, १०० च्यावर गाड्या बेस्टकडे पाठवल्याने अनिष्ट परिणाम होत आहे. प्रवासी सेवा अडचणीत येत आहे. त्यामुळे बाहेरगावी पाठवलेल्या वाहक-चालक व गाड्या तात्काळ परत बोलावण्याची मागणी करा असे भा.ज.पा. शिष्टमंडळाने आक्रमकपणे श्री. भोकरे साहेब यांना सांगितले. एस्.टी गाड्यांच्या सर्व फेऱ्या पूर्ववत चालू करणे, एस्.टी स्टँड समोर निवारा शेड उभी करणे आणि स्टँडच्या बांधकामाला गती देणे या सर्व गोष्टींबाबत भा.ज.पा. शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका घेतली. या सर्व विषयांवर सकारात्मक निर्णय शीघ्र गतीने घेतले जातील असे आश्वासन विभाग नियंत्रक श्री.भोकरे साहेब यांनी दिले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:22 PM 14-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here