अखेर रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना

0

ऑस्ट्रेलिया : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये शुक्रवारी फिटनेस टेस्ट झाल्यानंतर आता रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटीत खेळू शकणार आहे. त्यासाठी रोहित आज सकाळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. रोहित हा मुंबईहून दुबईला जाणार आहे आणि दुबईवरुन तो थेट सिडनीला पोहोचणार आहे. बंगळुरु येथे एनसीएमध्ये अनुभवी सलामीवीर रोहित शर्मानं फिटनेस चाचणी पास केली आहे. रोहित शर्मा तंदुरुस्त झाल्यामुळे भारतीय संघाची चिंता मिटली आहे. ऑस्ट्रेलियात रोहित १४ दिवसांच्या विलगीकरणात राहील. ऑक्टोबर महिन्यात ‘आयपीएल’दरम्यान मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला काही साखळी सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळेच रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. आता जवळपास एक महिना तंदुरुस्तीवर लक्ष दिल्यावर ‘एनसीए’चे प्रमुख राहुल द्रविड, फिजिओ आणि निवड समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितची चाचणी झाली. ही फिटनेस चाचणी रोहित शर्मा पास झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:53 PM 15-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here